About The Agency
सुकृत, या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे 'चांगले काम'! एक क्रिएटिव्ह एजन्सी म्हणून काम करत असताना आम्ही आपल्या संस्कृतीकडे कल ठेवून कलात्मक आशयनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात राहू.
कोणत्याही ब्रॅण्डच्या वास्तवदर्शी आणि आभासी अशा दोन्ही प्रतिमांमधला समतोल आम्ही साधतो. यासाठी आमच्या कामी येतात आमच्या सर्वोत्कृष्ट कलात्मक योजना, प्रतिभा आणि आमचे विविध क्षेत्रातले अनुभव. आम्ही व्हिडिओ प्रॉडक्शन, ब्रँडिंग, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाइट डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये कार्यरत असणारी सर्जनशील मंडळी आहोत. आम्हाला असं वाटतं की, द्रुकश्राव्य माध्यमातून प्रभावी संवाद साधण्यासाठी वायफायपेक्षा गरज असते ती उत्तम जनसंपर्क आणि आशयाच्या निवडीबरोबर चांगल्या ग्रहण क्षमतेची! नाही समजलं? खाली पाहा!
See below!
- संस्कृतीभिमुखता
- कार्यक्षमता
- गुणवत्तापूर्ण आशय
- थेट संवाद
Sukrut’s showtime!
सुकृत निर्मित
विस्तार सर्जशीलतेचा
आमची
यशोगाथा
एक दृष्टिक्षेप - आमच्या प्रवासाकडे
सुकृत'ची उत्कृष्ट संस्थापिका
हजारो स्वप्नं उराशी बाळगणारी आणि त्यांना सत्यात उतरविण्यासाठी रात्रीचा दिवस करणारी अदिती म्हणजे 'सुकृत'चा भक्कम पाया! एक मुलगी असण्याच्या नात्याने तिने मर्यादांना कधीच तिच्या सीमा बनवलं नाही. International Academy of Film and Television, Philippines मधून तिने Filmmaking मध्ये डिग्री घेतली आहे. चित्रपट सृष्टीतल्या कामाच्या 5 वर्षांपेक्षाही जास्त असणार्या अनुभवामुळे तिने सर्जनशील कौशल्याबरोबरच जनसंपर्क वाढता ठेवून सतत नव्याची कास धरली. पण लक्षात ठेवा हा, तिच्याबरोबर काम करताना गोड-गोड बोलण्यापेक्षा तुम्ही पण थोडे वेडे व्हा आणि deadlines चा पाठलाग करताना थकू नका.
.
आमचं काम
Highlights from our video content productions!